Latest Marathi News
Ganesh J GIF

मॉल मधील बिलावरुन तरुणीची हत्या करणाऱ्याला अटक

अज्ञात तरुणीच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश, यामुळे केली तरुणीची हत्या

हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावात २४ डिसेंबरला एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पण एका बिलावरुन मृतदेहाची ओळख पटवून मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अलका बाजीराव बेद्रे असे तरुणीचे नाव असून ती अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडची राहणार होती. पोस्टमॉर्टममध्ये या युवतीची गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने औंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी कोणताही पुरावा आढळून आला नसल्यामुळे पोलिसांसमोर प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे पुन्हा एकदा घटनास्थळी पाहणी केली असता, घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोठी बॅग व संभाजीनगर येथील एका मॉलचे बिल मिळून आले. त्याआधारे तपास सुरू करण्यात आला.मिळालेल्या माहितीच्या आधारे औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे एक पथकाने २९ डिसेंबर रोजी जामखेड येथील मृत महिलेच्या घरी जाऊन छायाचित्र दाखविले असता सदर मृतदेह हा अलका बाजीराव बेद्रे हिचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील तपास केला असता पोलीसांनी श्रीकांत सुरेश पिनलवार यास अटक केली. अलका आणि श्रीकांत मागील ९ महिन्यांपासून एकत्र राहत होते. पण अलीकडे श्रीकांत अलकावर संशय घेऊ लागला होता. त्यामुळे दोघात वाद होऊ लागले. याचाच मनात राग धरून २३ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर परिसरातील भाड्याच्या रूममध्ये अलकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह औढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात आणून टाकला होता. अखेर पोलीसांनी श्रीकांतला अटक केली आहे.

प्रकरणाची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, माधव जिव्हारे, कपिल आगलावे आणि पथकाने केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!