
मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशीच ड्रोन कॅमेरानं टेहाळणी झाल्याचं निदर्शनास आलं होतं.जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेरा द्वारे टेहाळणी होत असल्याच समोर आलंय. मराठा नेते मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या सरपंचाच्या घरावरही हे ड्रोन उडाल्याचं सांगितलं जातंय, तीन दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान गावच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी सरपंच तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. मागील आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशाच प्रकारे प्रकारची टेहाळणी झाल्याचं समोर आलं होत.यापूर्वीही अशी प्रकारच्या दोन तीन वेळा घटना समोर आल्या आहेत. मनोज जरांगे यांनी स्वत: ड्रोन पाहिले आणि आम्हाला देखील दाखवले, ड्रोन घराभोवती फिरत असल्याचं दिसलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याची प्रतिक्रिया अंतरवलीच्या सरपंचांनी दिली आहे.