
पुण्यात माजी महापाैरांच्या बंगल्याबाहेर जादूटोण्याचा प्रयत्न
जादूटोणा करणाऱ्या महिलेला पोलीसांनी केली अटक, महिलेचा मात्र वेगळाच दावा? काय घडल?
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि पुणे महापालिकेत माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शनिवारी अमावस्या असल्याने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याच्या समोर रात्री एका महिलेने नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबु, काळा अभिर ठेवला होता. या प्रकरणी महिलेच्या विरोधात भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानका काकासाहेब चव्हाण असे अघोरी महिलेचे नाव आहे. आरोपी धानका ही गेल्या चार महिन्यापासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर नारळ, दहीभात, उकडलेली अंडी, लिंबू, काळा अगीर हे काळ्या जादूचे वेगवेगळे प्रकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. धनकवडी येथील विद्यादीप गृह संस्था मर्यादीतच्या वतीने विवेक पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. मागील चर महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी रस्त्याच्या कडेला माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर हा उतारा/नैवैद्य ठेवला जात होता. येथे तीन रस्ते एकत्र येतात. या उताऱ्यामुळे लहान मुले आणि रहिवाशी भयभीत झाले होते. त्यांनी शनिवारच्या अमावस्येला लक्ष ठेऊन महिलेला रंगेहाथ पकडले, पण महिलेने मात्र गावाकडे दर अमावस्येला अशा प्रकारे उतारा रस्त्यावर ठेवण्याची पध्दत आहे. यामुळे मी तो ठेवला हा जादूटोणा नाही असा दावा चव्हाण नावाच्या महिलेने केला आहे. दरम्यान थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बडा नेत्याच्या घरासमोर जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी हा नेमका प्रकार काय आहे? या महिलेला हे करण्यासाठी कोणी सांगितलं आहे का? याबाबत चाैकशी करावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.