जमिनीच्या वादातून चुलती आणि चुलत भावाचा खून
दुहेरी खुनामुळे बार्शी तालुका हादरला, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
बार्शी – शेतीच्या वाटेच्या भांडणावरुन पुतण्यानेच धारदार हत्याराने चुलत भाऊ आणि चुलती अशा दोघांचा खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील भोयरे येथे घडली आहे.
सागर किसन पाटील (वय-३०), सिंधू किसन पाटील (वय-५५) (दोघे रा. भोयरे, ता. बार्शी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमी किसन पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी साैदागर पाटील व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केला आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक परजणे यांनी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार , कुटुंबातील शेतीच्या पाऊलवाट कारणावरून वादाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. आज अखेर त्याचे पर्यवसन खुनात झाले आहे.
खुनाच्या घटनेने बार्शी तालुका हादरला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करतआहेत. या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे