
रांची दि २८ (प्रतिनिधी) – नात्याला काळीमा फासणारी घटना झारखंडमधून समोर आली आहे. मामी आणि भाच्याने मिळून त्यांच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाचा काटा काढला आहे. मोहम्मद तौहीद आलम असे त्या मामाचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद यांची पत्नी, भाचा यांच्याशिवाय आणखी चार जणांचा अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद तौहीद आलम यांची पत्नी गौशिया परवीन आणि त्यांचा भाचा मोहम्मद इर्शाद यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता दोघांमध्ये तब्बल 1 हजाराहून अधिक वेळा व्हाट्सअप काॅल झाल्याचे आढळून आले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मोहम्मद तौहीद यांनाही होती. तौहीद यांनी दोघांना अनेकदा विरोध केला होता.पण तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण मामाचा विरोध वाढल्याने त्यांनी मामाचा काटा काढण्यासाठी मोहम्मद आरजू, जुमन, मंजर आणि बिलाल यांना मामाची हत्या करण्यासाठी साडेतीन लाखाची सुपारी दिली. त्या चार जणांनी १७ ऑगस्टच्या मामाची गोळी झाडून हत्या केली.विशेष म्हणजे गौशियाला दोन मुलं आहेत तरीही ती भाच्याच्या प्रेमात वेडी झाली होती.
पोलीसांनी तपास सुरु केल्यानंतर संशय आल्याने त्यांनी मामी आणि भाच्याचे काॅल डिटेल्स तपासल्यानंतर १ हजाराहुन अधिक काॅल दिसल्याने त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. या घटनेने कार्याला काळीमा फासला आहे.