Latest Marathi News
Ganesh J GIF

कमालच! तरुणींमध्ये या कारणामुळे जोरदार हाणामारी

मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, काॅलेज आवारातच दोघींमध्ये जुंपली

नोएडा – सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हे पाहून मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण या व्हिडिओत काॅलेजमधील मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

नोएडा येथील ग्रेटर नोएडा इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमधील मुलींमध्ये ही हाणामारी झाली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोन मुली एकमेकींचे केस पकडून हाणामारी करत आहेत. दोघींची हाणामारी तेथे उभे असलेले लोकही पाहत आहेत. एकमेकींना अगदी जमिनीवर लोळवतच त्यांची भांडणे सुरु आहेत. काही वेळानंतर इतर काहीमुली तिथे येतात आणि भांडणे सोडवतात. ही हाणामारी कोणत्या सामानासाठी नव्हे तर मुलासाठी होत आहे. मात्र या घटनेचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GreaterNoidaW या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकजण हा प्रकार पाहून थक्क झाले आहेत.

https://x.com/GreaterNoidaW/status/1870323714421628941?t=2JqbLpdyA6QCpQT-ayuXjg&s=09

अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखीवल दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मुली भांडताना केस का ओढतात, तर दुसऱ्या एका युजरने अरे काय चाललंय तरी काय असे म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!