Latest Marathi News
Ganesh J GIF

बदलापूर अत्याचारप्रकरण ! बदलापूरमध्ये बंदची हाक, संतप्त नागरिक रस्त्यावर

(मुंबई)  – बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तर पालकांकडूनही शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो २४ वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.याप्रकरणी शाळा प्रशासनाने तीन जणांवर कारवाई केली आहे. शाळेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या २ सेविकांनाही कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

तसेच तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बदलापूर पूर्वेकडील पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण संस्थेने एक चौकशी समिती नेमली आहे. बदलापूर पोलिसांकडून संस्था चालक व शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासोबच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!