Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी 27 जून रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामध्ये फलटण येथील रणजीत एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) हे जखमी झाले होते. त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. निंबाळकर यांचा उपचारादरम्यान 28 जून रोजी रात्री दोन वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गौतम शहाजीराव काकडे , गौरव शहाजीराव काकडे यांच्यासह तीन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणीचा व्यवहार झाला होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे 27 जून रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे याचा भाऊ गौरव काकडे याने गोळीबार केला. यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागली होती. जखमी झालेल्या निंबाळकर यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस करीत आहेत..

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!