
काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात गाण्यावर नवरीचा भन्नाट डान्स
नवरीचा डान्स सोशल मिडीयावर व्हायरल, नवरीच्या उत्सहाचे होतेय काैतुक, डान्स एकदा बघाच!
पुणे – अलीकडे लग्नात नवरा आणि नवरीचा डान्स करण्याचा ट्रेंड वाढत आहे. सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ पहायला मिळत असतात. त्यातच सध्या एका उत्साही नवरीबाईच्या डान्सचा धमाल व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्वत:च्या हळदीत फुल राडा केलेला आहे. नेटक-यांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.
आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरीने काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत सर्वत्र हळदीच्या कार्यक्रमाचा उत्साह दिसत आहे. त्यातच काही वेळात हळदीच्या कार्यक्रमात डीजे वाजण्यास सुरुवात होऊन नवरीसह अनेकजण डान्स करण्यास सुरुवात करतात. मात्र काही वेळातच डीजेवर ”काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात” हे गाणं वाजण्यास सुरुवात होते, त्यानंतर नवरीबाई सह तिच्या आजूबाजुला असलेली मंडळी जोरदार डान्स करण्यास सुरुवात करतात. पण या सर्वात नवरीचा उत्साह सर्वाधिक होता. नवरीने कमरेला साडीचा पदर बांधून केलेल्या डान्सने सोशल मिडियावर राडा केला आहे.
हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या ”यूट्यूब” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून त्यात तो ”@sagarruchika” अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर व्हिडिओला नेटकरी मंडळीने हजारो लाईक्स दिले आहे तर व्हिडिओचे व्ह्यूज ही दिवसेंदिवस वाढत आहे.