कुंभमेळ्यात सुंदर साध्वीने वेधले लक्ष पण समोर आले वेगळेच सत्य..
सुंदर साध्वी म्हणून तरूणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, तरुणीवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप
प्रयागराज – महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविक आणि साधूंनी स्नान केले. अनेक साधु यावेळी उपस्थित आहेत. पण यादरम्यान एका साध्वीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आता त्या साध्वीबद्दल नवीनच खुलासा समोर आला आहे.
हर्षा रिछारिया असं या साध्वीचं नाव आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्याबद्दल वेगवेगळे दावे समोर येऊ लागले आहेत. हर्षाने सांगितले की ती २ वर्षांपासून साध्वी आहे, त्यानंतर तिचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोकांनी दावा केला की ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. काही दिवसांपूर्वी तिने बँकॉकमध्ये एक शो होस्ट केल्याचा दावा देखील केला जात आहे. हर्षा बऱ्याच काळापासून इन्स्टाग्रामवर धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर कंटेंट तयार करत असते. तसेच, ती मेकअप आणि इतर शो होस्ट करण्याचे व्हिडीओही पोस्ट करत असते. एका युजरने विचारले की, दोन महिन्यांपूर्वी इव्हेंट होस्ट करणारी हर्षा अचानक साध्वी कशी काय झाली? तर एकाने तिने हिंदु धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना हर्षा म्हणाली की, साध्वी असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हर्षांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, “मी साध्वी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मी अजून साध्वी झालेली नाही. साध्वी होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी माझे नाव साध्वी हर्षा ठेवले. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटले जात असल्याचेही गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. हे सगळं पाहून बघून छान वाटतंय. पण अजूनही गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही. हिंदू धर्मात नागा साधु संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरुंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे. हर्षा रिछारियाला अजूनही दीक्षा मिळालेली नाही. कैलाशानंद गिरीजी महाराज निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर आहेत. त्यांच्याकडुन ती दिक्षा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
https://www.instagram.com/reel/DEzgAv-Scqq/?igsh=eWt5dmF0dTkxMng4
निरंजनी आखाड्याच्या शोभा यात्रेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रथावर स्वार झालेल्या साध्वीची मुलाखत व्हायरल झाली होती. हर्षा रिछारीया यांच्या इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग असून दहा लाख फाॅलोअर्स आहेत. व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांकडून सर्वांत सुंदर साध्वीची पदवी दिली होती.