Latest Marathi News
Ganesh J GIF

बीडचा बिहार! टोळक्याची तरूणाला काठ्यांनी बेदम मारहाण

अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, तो व्हिवळत होता पण टोळके मारहाण करत राहिले, घटनेने बीड हादरले

बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवली आहे. परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे, याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे या युवकाला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार बेदम मारहाण करत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली. दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. बीडच्या परळीत ही गंभीर घटना घडली असून संतोष देशमुख यांचे जसे अपहरण आणि त्यांना अमानुष मारहाण झाली होती, अगदी तशाच प्रवृत्तीची आठवण या घटनेने झाली आहे.

 

या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परळीत खळबळ उडाली आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!