
मारायच्या आधी मध्यरात्री नैवेद्य ठेवत द्यायचा राम नामाची घोषणा
वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल, महादेव मुंडेची हत्या केल्याचा आरोप, कराड अडचणीत
बीड – संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचा शार्प शुटर गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी हा व्हिडीओ शेअर करत गोट्या गित्तेचा क्रूरपणा जनतेसमोर आणला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
गोट्या गिते हा आरोपी असून त्याने आजवर अनेकांचा खून केला आहे, असा आरोप अनेकवेळा करण्यात आला आहे. गोट्या हा ज्याला संपवायचा आहे त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा, त्यानंतर तिथेच राम नाम सत्य है.. अशा घोषणा द्यायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा जीव घ्यायचा. गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा शूटर होता. सध्या तो फरार आहे. त्याने वाल्मिकच्या सांगण्यावरुन महादेव मुंडेंचा खून केल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी आपल्या पोस्टमध्ये हे आहेत परळीचे महाशय गोटू गित्ते.. हल्ला करणे, खून करणे, हात तोडने, पाय तोडणे, बापू आंधळेला सोबत नेऊन गोळी मारणे.. महादेव मुंडे, सातभाई, स्वप्नील पुजारी, मातंग समाजातील एक गरीब तरुण अशा अनेक घटना आहेत. असे म्हणत पोस्ट लिहिली आहे. श्री कराड, गोट्या गित्ते आणि त्याच्या साथीदारांनी महादेव मुंडे यांना मारहाण केली. अमानुष मारहाण करून मुंडे यांचे मांस तोडून नेण्यात आले. एका छोट्या प्लॉटमध्ये इगो हर्ट झाल्याने महादेव मुंडे यांना मारहाण झाली असे बांगर यांनी सांगितले आहे.
महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून वाल्मीक कराडने फोन केल्यानंतरच थांबला, असा आरोप महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.