
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली.

अनेक संसार उद्धवस्थ होण्याच्या परिस्थितीत आहेत. अनेक वर्षांपासून हा खरात महिलांवर अत्याचार करत. हेच नाही तर राजकीय लोकांचा हात असल्याने त्याला कोणीही धक्का लावू शकत नव्हते. भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना रूपाली चाकणकर दिल्यानंतर खळबळ उडाली. रूपाली चाकणकर यांच्या हे प्रकरण इतके जास्त अंगलट आले की, त्यांना राज्य महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. भोंदू अशोक खरात याने लोकांना धमकावून, भीती घालून त्यांच्या जमिनी बळकावल्या. खरातकडे काही फोन होते, त्यात तो महिलांचे नंबर वेगवेगळ्या नावाने सेव्ह करत असल्याची माहिती पुढे येतंय.

खरात गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहे. एसआयटीकडून अशोक खरात याची चाैकशी केली जात आहे. नाशिक पोलिसांनी रात्री उशिरा घरात याच्या मुलाला अटक केली. अशोक खरात याची पत्नी फरार असल्याची माहित मिळत आहे. खरातच्या मुलीच्या नावावरही काही फ्लॅट असल्याची माहिती मिळतंय.

नुकताच कोर्टाने भोंदू खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अखेर भोंदू खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यादरम्यानच सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू अशोक खरातची केस लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. SIT ने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती.
मात्र, सरकारी वकील ॲड अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला. 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगत स्पष्ट शब्दात ही केस चालवण्याकरिता नकार दिला.
ॲड अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनीच कोर्टात युक्तिवाद केला. भोंदू अशोक खरात याची केस चालवण्यास सरकारी वकिलांनी थेट नकार दिल्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता एसआयटीकडून कोणाला केस चालवण्याकरिता पत्र दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

