मोठी बातमी ! अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू ; दोघांना अटक, घटनेने परिसरात खळबळ
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर काहीवेळापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारा नंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ४ ते ५ राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं.
६६ वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार असून, त्यांनी अद्याप काँग्रेस सोडण्याची घोषणा केलेली नाही. ते मुंबई युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते.मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी १९९० च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. १९९२ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी २००४ ते २००८ या काळात मंत्रीही होते.