Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी!! पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार ;अजित पवारांच्या माजी नगरसेवकाला अटक

पुणे – पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला. या गोळीबाराचे कारण समज्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे विनोद नढे माजी नगरसेवक आहेत. विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघे राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो काळजी घेत जा? असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितले की, काळजी करु नको, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे. विनोद नढे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गंमतीत म्हटले, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नढे याने पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नढे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला. ती गोळी प्लेट ठेवायचा कपटावर लागली. सुदैव चांगले होते की, ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांना हे कारण समजल्यावर धक्का बसला.

गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे यांनी हे पिस्तूल घेतले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!