दीराच्या लग्नात मोठ्या वहीनीचा धमाकेदार डान्स
वहीनीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल, व-हाडी मंडळीही थक्क
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- दीर वहिनीचे नाते आदराचे आणि खटयाळपणाचे असते. त्यात आपल्या दिराचे लग्न असेल तर वहीनीचा तोरा काही निराळाच असतो. सध्या आपल्या दिराच्या लग्नात वहिनीने केलेला डान्स व्हायरल होत आहे.
आपल्या दिराच्या लग्नात वहीनीने मेरे देवर की शादी है’ गाण्यावर अतिशय भन्नाट डान्स केला आहे. वहीनींचा डान्स एवढा भन्नाट होता की व-हाडी मंडळीनी त्याला जोरदार दाद दिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वहिनी तिच्या दिराच्या लग्नात डान्स फ्लोअरवर आनंदाने डान्स करत आहे. यादरम्यान वहीनीचे एक्स्प्रेशन्स देखील कमाल आणि पाहण्यासारखे होते. हा डान्स पाहून पाहुणे आणि नातेवाईकही थक्क झाले आहेत. वहिनींच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी अप्रतिम प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wedding_dreams30 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जोरदार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला आतापर्यंत शेकडो लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय अनेकांनी छान कमेंटही केल्या आहेत.