
पुण्यात वर्दळीच्या रोडवर दुचाकीस्वाराला दोघांनी लुटले
लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल, पुण्यात नेमके चाललयं काय?, पोलिसांचा असाही निष्काळजीपणा
पुणे – पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोयता गँग, गाड्यांची तोडफोड यासारख्या घटकांमध्ये वाढ झाली आहे. तर वर्दळीच्या वेळीही नागरिकांना लुटल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
वारजेत दुचाकास्वारी लुटमार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास गणपती मठाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना निरंजन माने नावाच्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याचे समोर आले आहे. संतापजनक बाब म्हणजे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निरंजन माने यांना पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. “ड्युटी बदलण्याची वेळ झाली आहे, उद्या या असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयाजवळ ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. निरंजन माने हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास गणपती माथा येथून देवदर्शन घेऊन घरी परतत होते. रस्त्यावरून मोटरसायकलवर जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अडवले. त्यांना धमकी देऊन त्यांच्या खिशातील दहा ते अकरा हजार रूपये काढून घेतले.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा आणि शहरातील वाढता गुन्हेगारीचा धोका लक्षात घेता प्रशासन यावर काय कारवाई करणार? हा मोठा प्रश्न आहे. पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सगळीकडून नाराजी व्यक्त होत आहे.