Latest Marathi News
Ganesh J GIF

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली ; सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला धोका, पोस्टमधून मोठे खुलासे समोर

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगकडून दावा करण्यात आली आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतंही युद्ध नको होतं, परंतु बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते.

बिश्नोई गँगकडून एक फेसबूक पोस्ट करण्यात आली आहे. ‘ओम् जय श्री राम, जय भारत… जीवनाचं मुल्य मला माहिती आहे… मी शरीर आणि पैसा धूळ मानतो. मी पाळलेलं ते सत्कर्म होतं, ते मैत्रीचं कर्तव्य होतं.’ अशी पोस्टची सुरवात करण्यात आली.बिश्नोई गँगने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तू आमच्या भाईचं आज नुकसान केलं आहे. आज जे बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान गात आहेत एकेकाळी दाऊद मकोका प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होते. सिद्दीकीयांच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं…‘आमचं कोणासोबत देखील शत्रुत्व नाही. पण जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल. त्यांनी यापुढे सावध राहा… आमच्या कोणत्याही भावाच्या जीवाला धोका झाल्यास आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ.. पहिला वार आम्ही कधीच केला नाही…जय श्री राम जय भारत…’ असं देखील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.

 

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगितलं जात. कारण सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी आहे. गुंड बिश्नोई याने सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अभिनेत्याच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला. तेव्हा देखील बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!