
भाजपा जिल्हा अध्यक्षाचा कार्यालयातील अश्लील व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पक्षाकडून नोटीस, जिल्हा अध्यक्ष म्हणतात मी फक्त तिला...
गोंडा – काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा हायवेवरील अश्लील कृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ते प्रकरण ताजे असताना आता उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्हा प्रमुखाचा पक्ष कार्यालयातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपाचे गोंडा जिल्हा अध्यक्ष अमर किशोर कश्यप यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत कश्यप हे एका महिला कार्यकर्त्याला मिठी मारताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच पक्षाने कश्यप यांच्याविरोधात कारवाई केली आहे. तर कश्यप आणि संबंधित महिलेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर कश्यप दिसत आहेत. तसेच एक महिलाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आधी महिला पायऱ्या चढून येते. नंतर त्यांच्या पाठोपाठ अमर किशोर कश्यप देखील येतात. दोघेही थोडं पुढे चालत जातात आणि किशोर हे महिलेला मिठीत घेतात. त्यानंतर ते पायरी चढत वरती जातात. भाजपचे सरचिटणीस गोविंद नारायण शुक्ला यांनी कश्यप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओवर बोलताना कश्यप म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही पक्षाची कार्यकर्ती आहे. त्या दिवशी तिची तब्येत बिघडली होती. म्हणून मी तिला कार्यालयात घेऊन गेलो. पायऱ्या चढत असताना तिला चक्कर आली, म्हणून मी तिला आधार दिला. हा व्हिडिओ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे.” असा त्यांनी आरोप केला आहे. गोंडा येथे आल्यावर माझी प्रकृती अचानक बिघडली. जिलाध्यक्ष कश्यप यांनी आराम करण्यासाठी भाजप कार्यालयात सोडलं. पण अचानक मला चक्कर आली, त्यावेळी त्यांनी मला पडण्यापासून वाचवलं. ते माझ्या वडिलांसारखे आहेत, असे स्पष्टीकरण त्या महिलेनं दिले आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम यांनी हा व्हिडिओ त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातील आहे आणि १२ एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आपल्याच काही लोकांद्वारे व्हायरल झाला असल्याचा दावा कश्यम यांनी केला आहे. आता पक्ष काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.