
भाजप नेत्याचे महिलेसोबत स्मशानभूमीत अश्लील चाळे
रासलिलेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, गावकऱ्यांनी पकडताच म्हणाला पाया पडतो पण...
बुलंदशहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल बाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत स्मशानभूमीत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
भाजप आणि वाद असे समीकरण काही दिवसापासून रूढ झाले आहे. भाजपा नेत्यांचे अनेक अश्लील रासलीला समोर आल्या आहेत. रोड, कार्यालय यानंतर आता एका भाजपा नेत्याची स्मशानभूमीतील रासलीला समोर आली आहे. भाजपा नेता राहुल बाल्मिकी आधी स्मशानभूमीतील झाडाझुडपात आपली कार पार्क करतात. त्यांच्यासोबत एक विवाहित महिला देखील आहे. तिच्यासोबत नेत्याची रासलीला सुरू झाली. तेथून जात असताना काही गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी झाडाझुडपात जाऊन पाहिलं. तर कारच्या आत नेते अर्धनग्न अवस्थेत होते. गावकऱ्याने कारची काच उघडण्यास सांगितली. नंतर व्हिडिओ शूट केला. दरम्यान, कारमधून उतरून राहुल यांनी गावकऱ्यांची माफी मागण्यास सुरूवात केली. ‘दादा पाया पडतो, पण व्हिडिओ शूट करू नका’, असं म्हणत व्हिडिओ शूट न करण्यास विनंती केली. सोबत असलेली विवाहित महिला ओढणीने तोंड लपवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करून सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राहुल बाल्मिकी फरार आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतरही शिकारपूर पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. दरम्यान, राहुल यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पक्षाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
भाजप नेत्याला स्मशानभूमीत विवाहित महिलेसोबत रासलीला करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. याचा व्हिडिओ शूट करून गावकऱ्यांनी समाजमाध्यमांमध्ये व्हायरलही केला आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली.