Latest Marathi News
Ganesh J GIF

तिरंगा रॅलीत भाजपा आमदाराने तिरंग्याने पुसला घाम

भाजपा आमदाराकडून ध्वजाचा अपमान, काँग्रेस आक्रमक, भाजपा आमदाराचे प्रत्युत्तर

जयपूर – भाजपाने देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपाकडून अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. पण आता या तिरंगा रॅलीत भाजपा आमदाराच्या एका कृतीमुळे वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजपा आमदार बालमुकुंदाचार्य यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेंव्हा आमदारांनी तिरंगा ध्वजाने नाक आणि घाम पुसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, तसेच भाजपा आमदाराने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांनी भाजपा आमदाराचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “तिरंगा देशाची शान आहे, रुमाल नाही. ज्या तिरंग्यासाठी आपले वीर जवान प्राणाची आहुती देतात, त्या तिरंग्याने भाजापाचे जयपूरचे आमदार बालमुकुंदाचार्य नाक पुसत आहेत. हे भाजपावाल्याच्या फक्त दुटप्पी वागणूक नाही, तर देश आणि संविधानाबद्दल गद्दारी आहे. त्या लाखो शहीदांच्या बलिदानाचा अवमान आहे ज्यांनी या तिरंग्यासाठी त्यांचा झीव दिला. आमदार बालमुकुंदाचार्य माफी मागा अशा मागणीची पोस्ट केली आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यात भाजपा आमदार नाक आणि घाम पुसताना दिसत आहेत. दरम्यान भाजपा आमदारने मात्र असे काहीच झाले नसल्याचा दावा केला असुन काँग्रेसवर टिका केली आहे. आजच्या रॅलीत काँग्रेस कोठे होती. तिरंग्याचा अपमान काँग्रेसवाल्यांनी केला आहे. तिरंग्याचे डिझाईन घेऊन त्यावर पंजा छापला, ज्याचा रस्त्यावर अपमान केला जातो,” असेही बालमुकुंदाचार्य म्हणाले आहेत.

 

मी तिरंगा हातात घेतलेला होता. गर्दीत चालताना कोणीतरी हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कापड हातात दिले, ज्याला मी प्रेमाने ओठांना आणि हृदयाला लावलं. ते कापड घेऊन… हातात दुसरे कापड होते, ज्याने घाम पुसला… तिरंग्याचा मान सन्मान आम्हाला कळतो….” असे म्हणत आरोपांचा इन्कार केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!