Latest Marathi News
Ganesh J GIF

बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई ; तब्बल ४० जणांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमके कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती.

राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु काही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० जणांवर भाजपने गंभीर कारवाई केली आहे. भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई केली आहे.

भाजपने बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, पण काही जणांनी उमेदवारीवर ठाम राहत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे ४० जणांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये सावंतवाडीतील विशाल परब, अक्कोलटमधील सुनील बंडगर, अमरावती येथील जगदीश गुप्ता, श्रीगोंदामधील सुवर्णा पाचपुते, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शोभा बनशेट्टी, साकोलीतील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण ४० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरांवर अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार बंडखोरावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!