Latest Marathi News
Ganesh J GIF

बॉडी बिल्डर तरुणांना घातक औषध विकणाऱ्याला अटक

बॉडी बिल्डिंगसाठी वापरली जाणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेण्याची आवश्यकता असताना त्या औषधांची बेकायदा विक्री करणार्‍या जिम व्यवसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.त्यांच्याकडून मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 13 बाटल्या तसेच पाच इंजेक्शन सिरीज जप्त करण्यात आल्या आहे.आझाद मुमताज खान (वय.41,रा. आंबेगाव बु) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खान याच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी भादवि कलम 336,276 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि अवधुत जमदाडे यांना बातमी मिळाली होती की, सातारा रोडवरील लोखंडी पुलाच्या अलीकडे एक व्यक्ती बॉडी बिल्डिंगसाठी अवैधपद्धतीने घेतले जाणारे इंजेक्शनची विक्री करत आहे.त्यानुसार पथकाने खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो जिम व्यवसायिक असून, तो मेफेन्टरमाईन सल्फेट या औषधांची अवैधपद्धतीने विक्री करत असल्याचे समोर आले. त्याने आत्तापर्यंत अशा किती इंजेक्शनची विक्री केली आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!