
प्रियकराने केली लिव्ह-इन पार्टनरची पेट्रोल टाकून निर्घृण हत्या
पाठलाग करून गाठले आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले, या संशयामुळे केली हत्या, नेमके काय घडले?
बंगळूरु – बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह – इन पार्टनरला जिवंत जाळले. घटनेच्या वेळी, महिला एका नातेवाईकासह मंदिरातून कारमधून परतत होती. आरोपीने सिग्नलवर गाडी थांबवली, तिच्यावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले.
मृत महिलेचं नाव वनजाक्षी आहे. तर आरोपीचे नाव विठ्ठल आहे. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या गाडीतच पेट्रोल टाकून त्याने आग लावली. महिलेला गाडीतून काढून रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जीव वाचवता आला नाही. महिला आणि आरोपी मागील काही वर्षांपूर्वी एकत्र लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठलने पीडित महिला वनजाक्षी हीच्यासोबत बऱ्याच कालावधीपासून लिव्ह-इनमध्ये राहत होता. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. वनजाक्षीनेही जवळपास चार वर्षांपूर्वी विठ्ठलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी दोनदा लग्न केले होते. एकत्र राहत असताना विठ्ठल वनजाक्षीचा छळ करत होता. हिंसाचाराला कंटाळून वनजाक्षी विठ्ठलपासून दूर राहू लागली होती. तिने दुसऱ्या पुरुषाशीही मैत्री केली होती. त्या दोघांना विठ्ठलने पाहिले होते. वनजाक्षी तिच्या नव्या प्रियकरासह कारमधून फिरत असताना विठ्ठलने त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्याने वनजाक्षी, तिचा प्रियकर आणि ड्रायव्हर यांच्यावर पेट्रोल टाकले. वनजाक्षीचा प्रियकर आणि कारचा ड्रायव्हर हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग केला, तिच्यावर अधिक पेट्रोल ओतले आणि लाईटरने तिला पेटवून दिले. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांसह वनजाक्षीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत विठ्ठल स्वतःही भाजला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विठ्ठलला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं की, “हे संपूर्ण प्रकरण वैवाहिक जीवनात झालेल्या वादातून घडलेलं आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही महिलेचा मृत्यू झाला. या घृणास्पद गुन्ह्यात आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.