
चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, राॅडने डोक्यात केले वार, प्रेम कहानीचा रक्तरंजित शेवट
नागपूर- नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने विधवा प्रेयसीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.
हेमलता किशोर वैद्य असे मृत तरुणीचे नाव आहे. हेमलाताचे आरोपी अक्षय दातेसोबत प्रेससंबंध होते. ते दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सवालीवाघ येथील रहिवासी होते. आजारपणामुळे हेमलताच्या पतीने निधन झाले. तिला दहा वर्षांची मुलगी आहे. मूळची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील असलेली हेमलता दाभा येथे अंकाशी सोसायटीत राहायची. हेमलता आणि अक्षय हे लग्नदेखील करणार होते. पण अक्षय वेळोवेळी हेमलताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद ही झाले होते. हेमलता ही एकांशी सोसायटीतील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अक्षय सोसायटीत गेला. तेव्हा ती एका व्यक्तीशी बोलत होती. अक्षयने त्यावरून तिच्याशी वाद घातला व तिच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार वस्तूने वार करत तिला जखमी केले. सोसायटीतील लोकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांना याची माहिती दिली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. विशेष म्हणजे केवलरामानी यांच्या सोसायटीतील काही फ्लॅट विकल्या जायचे होते. त्यामुळे हेमलता हिला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवले होते. मात्र काही महिन्यांअगोदर अक्षयने त्यांना फोन करून तिला कामावर का ठेवले असे विचारले होते व तिला कामावरून काढायला सांगितले होते. केवलरामानी यांनी तिला कामावरून काढले होते. मात्र तिने विनंती केल्यावर परत कामावर ठेवले होते, ही माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
‘मी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करणार होतो. परंतु, ती मला दगा देत होती. त्यामुळे तिचा मी खून केला’ अशी कबुली प्रियकर अक्षयने पोलिसांना दिली आहे.