
‘या’ कारणामुळे प्रियकराने प्रेयसीची केली निळ्या ड्रममध्ये बुडवून हत्या
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, घरी घेऊन जात केली निर्घृणपणे हत्या, ड्रममुळे मुस्कानने केलेल्या हत्येची आठवण
देवास – मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून एक खळबळजनक हत्याकांड समोर आलं आहे. येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली आहे. मुस्कानने केलेल्या हत्येसारखा हा प्रकार घडल्याने याची चर्चा होत आहे.
लक्षिता चौधरी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मोनू उर्फ मनोज चौहान असे आरोपीचे नाव आहे. लक्षिता २९ सप्टेंबरला घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. पण रात्री ती घरी न आल्यामुळे कुटुंबाने पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर लक्षिताची मोनू उर्फ मनोज चौहान नावाच्या मुलाशी मैत्री असल्याचे समजले. सुरुवातीला त्याने याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. पण खरेतर लक्षिता तिच्या मित्रासोबत होती. पण मनोजने तिला रुमवर नेले आणि तिथे नेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याने तिला निळ्या ड्रममध्ये बुडवले आणि हत्या केली. एका बेडशीटमध्ये तिचा मृतदेह गुंडाळून ठेवून तो निघून गेला होता. पोलिसांच्या चौकशीनंतर मनोजने तरुणीच्या कुटुंबीयांना मेसेज केला आणि सांगितले की, मी तिची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह त्याच्या घरात आहे. लक्षिताच्या कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. घराचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर त्यांना बेडशीटमध्ये मृतदेह दिसला. गरबा खेळण्याचा ड्रेसमध्ये तरुणीचा मृतदेह पडलेला होता. तिचा मृतदेह कुजल्यामुळे खूपच वाईट स्थितीत होता. या घटनेनंतर मनोज स्वतः हुन पोलिसांना शरण आला. मोनूने पोलिसांना सांगितले की तो लक्षिताचा प्रियकर होता, परंतु ती दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात होती आणि यामुळे तो संतापला आणि त्याने लक्षिताची हत्या केली. देवास येथील सिटी कोतवालीचे स्टेशन हाऊस ऑफिसर श्याम चंद्र शर्मा यांनी सांगितले की पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदूरला पाठवला आहे आणि आरोपींची चौकशी सुरू केली आहे. या हत्येमध्ये आणखी कोणाचा समावेश होता का? किंवा इतर कोणते कारण होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील निळ्या ड्रम गर्ल मुस्कानची कहाणी सर्वांनाच माहिती आहे. मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली आणि नंतर त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट टाकून बंद केले होते. ही हत्या देखील तशीच करण्यात आली आहे.