
नवरीने स्वतः च्या हळदी कार्यक्रमात घातला जोरदार राडा
व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नवरीला पाहुन म्हणाले नवऱ्याचे खरे नाही....
मुंबई – सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यातच डान्सच्या व्हिडीओचा समावेश असतो. पण जर डान्स नवरा नवरीचा असेल तर तो जास्त व्हायरल होतो.
लग्न असेल तर त्यात नवरीचा डान्स होणार नाही असे अगदी क्वचितच घडते. कारण लग्न आणि डान्स असे समीकरणच आता बनले आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात हळदीने माखलेली नवरी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, हळदीने माखलेली नवरी जबरदस्त डान्स स्टेप करत आनंदाने नाचत आहे. यावेळी तिला तिच्या मैत्रीणींची देखील उत्तम साथ लाभली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @malvaniphotographervlogs इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखाच्या घरात व्हिव्ज मिळाले आहेत. दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
नवरीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काहींनी नवरीचे काैतुक केले आहे तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकूणच सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.