Latest Marathi News
Ganesh J GIF

सख्ख्या भावा बहिणीला टिप्परने चिरडले,संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ, हृदयद्रावक घटना

नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडलीआहे. कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहिण-भावाला चिरडत नेले आहे. या घटनेमध्ये सख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटवला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येऊन राज्य राखीव दलाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठवले आहेत. अंजली ननेलाल सैनी (वय 20) आणि सुमित ननेलाल सैनी (वय 16) असे या दोघा मृत बहिण भावाचे नावे असून ते बिडगाव येथील अंबेनगर येथील रहिवासी आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पींग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्पर आणि इतर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. हा रास्ता कायम रहदारीचा असल्याने या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना घडत असतात. दरम्यान, आज 29 डिसेंबरच्या सकाळी दहा- साडे दहाच्या सुमारास अंजली सैनी आणि तिचा लहान भाऊ सुमित सैनी हे आपल्या दुचाकीने कामावर जात होते. सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता तर अंजली एका कॅफेत काम करत होती. दरम्यान रस्त्याने भरधाव येणाऱ्या टिप्परणे यांच्या वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या टिप्परने या दोघांसह मोटर सायकला काही अंतर फरफटत नेले. ज्यामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

संतप्त जमावाने केली दगदफेक, टिप्परही पेटवला

घटना घडतांच नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली. त्यानंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत टिप्परला आग लागली होती. लागलेली आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्नीशमन दलावरही रोष व्यक्त केला. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सदर्शन, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी संतप्त नागरिकांच्या गर्दीला पांगवले आणि परिस्थिति आटोक्यात आणली. त्यानंत पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!