महिला प्रवासी आणि महिला कंडक्टरमध्ये झिंज्या धरत हाणामारी
गंगाखेड अहमदपूर बसमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
परभणी दि २५(प्रतिनिधी) – अनेकदा प्रवासात प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद होतात हे वाद कधी कधी चांगलेच वाढतात. असाच एक वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.हा व्हायरल व्हिडिओ परभणीतला आहे.पण या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.
मिळालेली माहिती अशी की, गंगाखेड आगारातून अहमदपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक महिला प्रवासी बसली होती. ही महिला गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील बस स्थानकावर उतरली नाही. त्यामुळे या महिलेने पुढच्या स्टॉपवर गाडी थांबवून आपल्या उतरून द्यावे, अशी मागणी केली. त्यावर गावांमधील पहिल्या स्टॉपवर तू का उतरली नाही? असं कंडक्टरने म्हटल्याने या दोघींचं भांडण सुरू झाले.ते इतके वाढली की दोघामध्ये हाणामारी झाली.त्यानंतर गाडी स्टॉप वर थांबवली असता महिला वाहकाने महिला प्रवाशाचे केस धरून ओढत असल्याचा व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.मात्र दोन्ही महिला या एकमेकांच्या ओळखीच्या निघाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी दोन्ही महिलांकडून आम्ही गुन्हा दाखल करणार नसल्याचे लेखी लिहून घेतले आहे. प्रवासी महिला जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत.परंतु प्रवासी महिलेनं सांगितलं की वाहक महिलेनं तिला केस ओढून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकाराची चर्चा गंगाखेड तालुक्यामध्ये होत आहे.