Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा आंदोलक आणि बसमधील प्रवाशांमध्ये हाणामारी

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, बसची काचही फुटली, नेमकी चूक कोणाची?

मुंबई – मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. पण काही ठिकाणी मराठा आंदोलक आणि स्थानिक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सांताक्रूझमध्ये एका बसमध्ये मराठा आंदोलक आणि प्रवासी आमनेसामने आले. यावेळी जोरदार हाणामारी बघायला मिळाली. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ ३१ ऑगस्टचा असल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये नेमका वाद कशामुळे सुरू झाला हे समजू शकले नाही. बस जुहू बस स्थानक येथे उभी असताना मराठा आंदोलक आणि बसमधील प्रवासी यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे दोन्हीबाजुनी एकमेकांच्या अंगावर धाऊन झाल्याचा प्रकार घडला. यावेळी मराठा आंदोलकांनी एका प्रवाशाला बसमध्ये खाली पाडून मारहाण केली. या भांडणात बसची काच देखील फुटली. वाद होत असल्याचा आवाज आल्याने प्रवर्तक आणि कर्मचारी बसमध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण पोलीस आल्यानंतर मराठा आंदोलक आणि वाद करणारे दोन प्रवाशी पण पळून गेले. त्यामुळे नेमका वाद काय होता, आणि चूक कोणाची होती, याची माहिती मिळू शकली नाही. पण मारहाणीचा व्हिडिओ मात्र जोरदार व्हायरल झाला आहे.

 

 

बसगाडी उभी करून दुसऱ्या बसने प्रवाशी मार्गस्थ करण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. मारहाण करणारे मराठा आंदोलक होते की, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!