चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर?’ला काँग्रेसचे ‘धीस इज धंगेकर’ने उत्तर
कसब्यात बॅनरबाजी जोरात, भाजपाच्या पराभवानंतर चंद्रकात दादांची सपशेल माघार
पुणे दि ४(प्रतिनिधी)- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्याचे कवित्व अजूनही सुरू असुन आता चंद्रकांत पाटलांच्या हू इज धंगेकर? ला काँग्रेसने धंगेकर नाऊ एमएलए असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
कसबा पोटनिवडणूक भाजपकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते या भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उतरले होते. पण भाजपाला धुळ चारत धंगेकरांनी भाजपाचा गड खालसा केला. त्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या कमी.लेखत ‘हू इज धंगेकर’, असा खोचक सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विजयानंतर महाविकास आघाडीकडून पुण्यात ठिकठिकाणी ‘धिस इज धंगेकर’ अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर. असं उत्तर देण्यात आलं आहे. या बॅनर्सवर असा मजकूर लिहून चंद्रकांतदादा यांना जशास तसे उत्तर देण्यात आले असून चंद्रकांतदादांची खिल्लीही उडवण्यात आली आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनी धंगेकर यांच्याबद्दल बोलणे टाळत माघार घेतल्याचे दिसून आले आहे.
मी गेल्या दहा बारा दिवसांपासून ऐकतोय. धंगेकर विरुद्ध रासने. अरे हु इज धंगेकर?, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. एका विराट सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले होते. त्यालाच आता काँग्रेसकडून बॅनर्स लावून उत्तर दिले जात आहे.