पुणे प्रतिनिधी – सुधा बोडरे, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-1 ने दुचाकी चोरणार्या दोघांना अटक केली असुन त्यांच्याकडून 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 6 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. कार्तिक दत्तात्रय दळवी (20, रा. त्रिमुर्ती फ्लेक्स प्रिटींगच्या पाठीमागे, शिळीमकर यांच्या घराजवळ, मु.पो. पौंड, ता.मुळशी, जि. पुणे) आणि दिगंबर उर्फ दिनु अंकुश आंब्रे (26, रा. दिगंबर नाथ तरूण मंडळ, सचिन शेंडकर यांच्या रूममध्ये, पौड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील आणि श्रीकांत दगडे यांना आरोपी बाबत माहिती मिळाली होती. आरोपी हे दुचाकी चोर असून ते दोघे वारजे ब्रिजजवळील चर्च जवळ थांबले आहेत. त्यांच्याजवळ यामादा एफझेड मॉडेलची मोटारसायकल असल्याचे पोलिसांना बातमीदारामार्फत समजले. पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असताना दोघांची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असून त्यांच्याकडे असलेली यामाहा चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना अटक केली.
अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कोथरूड पोलिस स्टेशन, फरासखाना, खडक पोलिस स्टेशन , हवेली पोलिस स्टेशन आणि अहमदनगर येथील कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एकुण 6 वाहने चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार , अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख , पोलिस अंमलदार आजीनाथ येडे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते आणि नारायण बनकर यांच्या पथकाने केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जाहिरात