Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात चक्क गुन्हेगारांकडून पोलिसांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल, गुन्हेगार पोलीसांचा याराना चर्चेत

पुणे – सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांची नियंत्रण कक्षात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे.

सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून केक कट केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे होते. यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते विशेष म्हणजे उपस्थित असलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. या चार पैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस खात्याकडून प्राप्त झाली आहे. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले ही आतिशबाजी बराच वेळ सुरू होती,या सगळ्या प्रकाराचा ड्रोन द्वारे चित्रीकरण चित्रीकरण करण्यात आले आहे. या बर्थडे सेलिब्रेशन प्रकरणी सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे निलंबन केले आहे.

बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये पोलिसांबरोबर कोणते गुन्हेगार सहभागी झाले होते, याची चर्चा सुरू आहे. त्यांची लपवाछपवी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र व्हिडिओवरून त्यांची माहिती पोलिस अधिकारी काढत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!