
पुण्यात सराईत गुन्हेगारांचा दोघांवर गोळीबार
जुन्या रागातून गोळीबार, एकाच मृत्यू, एकजण जखमी, हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पुण्यात चाललयं काय?
पुणे – पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. मावळ तालुक्यात देहूरोड मध्ये गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गोळीबारात विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीचं नावं नंदकिशोर यादव असं आहे. याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या घटनेमध्ये रेड्डी चा मृत्यू झाला आहे. देहूरोडच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. यादव व रेड्डी हे मित्र असून यादव यांच्या पुतणीचा वाढदिवस होता. त्यासाठी विक्रम या कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी विक्रम व आरोपींचा वाद झाला. या वादात आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी विक्रमला लागल्याने गंभीर जखमी झालेल्या विक्रमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यादव यांचे सराईत गुन्हेगार फैजल आणि शाबीर शेख यांच्यासोबत वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी रेड्डी यांनी मध्यस्थी केली होती.याचा राग मनात धरून शाबीर आणि फैजलने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. तर नंदकिशोर यादव यांना दगडाने मारहाण केली. यात नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी झाले. तर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विक्रम रेड्डी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्याचे फुटेज समोर आले आहे.
याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकं रवाना केली आहेत. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहर परिसरामध्ये खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे.