Latest Marathi News
Ganesh J GIF

धोकादायक! पुण्यातील तरुणीचा बुलेटवर जीवघेणा स्टंट

सोशल मिडीयावर प्रसिद्धीसाठी तरुणीचा प्रताप, पोलीसांनी समज देऊनही तरुणीचा बेदरक, व्हिडिओ व्हायरल?

पुणे – सोशल मिडीयावर रिल्स करण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पण यातील काहीजण सोशल मिडीयावर व्हिव्ज मिळवत प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणे स्टंट करत असतात.पुण्यात सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुण्यात स्टंटबाजी करणारी तरुणी चर्चेत आहे. या तरुणीचे नाव माधवी कुंभार असे आहे. ती पुण्यातील हडपसर परिसरात राहते. तिने नवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या तरुणीला या आधीही पोलिसांनी समज दिली होती. तरीही तिने परत जीवघेणा स्टंट केला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, माधवी बुलेटवर चक्क उभे राहून तिने ही स्टंटबाजी केली आहे. बॉलिवूडच्या एका गाण्यावर बुलेटवर उभी राहत तिने स्टंट केला आहे. लाइक्स, फॉलोवर्स मिळवण्यासाठी तिने स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. दरम्यान पोलीस तिच्यावर काय कारवाई करणार हे पहावे लागेल.

 

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात. सध्या माधवीच्या रिल्सवर अनेकांनी नाराजी आणि संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!