Latest Marathi News
Ganesh J GIF

बायको प्रियकरासोबत पळून गेल्याने हताश पतीची आत्महत्या

लग्नाच्या चार महिन्यातच पत्नी प्रियकरासोबत पळाली, व्हिडीओ करत अंकितचा टोकाचा निर्णय

नोएडा – लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने हताश आणि निराश झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे, तसेच पोलीसांवरही नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंकित असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. अंकित हा कावड यात्रेला गेला होता. यादरम्यान त्याला माहिती मिळाली की त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली आहे. त्यामुळे तो यात्रा सोडून घरी परतला. परत आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला जात तक्रार दाखल केली. तसेच वारंवार तपासासाठी विनंती केली. पण पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याने तो निराश झाला होता. याच निराशेतून अंकितने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण आत्महत्येपुर्वी अंकितने एक व्हिडिओ बनवत पत्नीचे सोडून जाणे आणि पोलिसांनी दाखवलेला निष्काळजीपणा यामुळे आपण निराश झालो असल्याचे सांगत आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांच्या मते, या घटनेनंतर तो अस्वस्थ झाला होता. त्यानंतर त्याचा मानसिक स्थिती सतत बिघडली गेली होती. तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून संबंधित प्रकरणात क्रिश नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी क्रिशच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी अंकितची पत्नी, सासू, सासरे आणि एका अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच एका तरूणाला अटक केली असून इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!