Latest Marathi News
Ganesh J GIF

लव्ह मॅरेज करूनही सासरी जाच महिलेने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस शिपाईच्या पत्नीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, लग्नाच्या चार महिन्यात साैम्यसोबत सासरी काय घडले?

लखनऊ – उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे प्रेम विवाह झाला असतानाही हा छळ केला जात होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सौम्या कश्यप असे या महिलेचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत आपली कहाणी संपूर्ण जगासमोर मांडली आहे. पोलीस शिपाई अनुराग सिंह यांचा चार महिन्यांपूर्वी साैम्या सोबत प्रेम विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही काळातच सौम्याच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. कारण सौम्याने कोणताही हुंडा आणला नव्हता. यामुळे तिच्याशी गैरवर्तन केलं जात होतं. या सर्व त्रासाला कंटाळून तिने रविवारी ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी सौम्याने इंस्टाग्रामवर एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सौम्याने सांगितलं की, माझा पती, दीर आणि सासरचे लोक माझा शारीरिक व मानसिक छळ करत आहेत. मला वारंवार मारहाण केली जाते. वकिलाने माझ्या पतीला मला मारण्यास सांगितलं. त्याने सांगितलं की तो माझ्या पतीला वाचवेल. मी जीव देणार आहे, पण योगी आदित्यनाथ सरांना विनंती करते की हे लोक सुटू नयेत. अशी विनंती तिने केली आहे. सौम्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून, तिचा मोबाईल, तिचे चॅट्स, इन्स्टाग्रामवरचा व्हिडिओ हे सगळं पुराव्याच्या रूपात गोळा करण्यात येत आहे.

 

सौम्याच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पती, दीर आणि सासरच्यांविरुद्ध दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांचा प्राथमिक तपास सुरू असून, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!