Latest Marathi News
Ganesh J GIF

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धनाजी नवले “तीन जिल्ह्यातून” तडीपार..बघा सविस्तर बातमी

सोलापूर : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनाजी प्रताप नवले ( रा. कांदलगाव ता. बार्शी जि. सोलापूर) याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यास सोलापूर सह तीन जिल्ह्यातून तीन महिन्यांकरीता तडीपार करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे धनाजी नवले (रा. कांदलगाव ता. बार्शी जि. सोलापूर) याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन सुद्धा त्याचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याच्यामुळे कांदलगाव परिसरातील लोकांचे जीवितास व शासकीय मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता.

तसेच आगामी लोकसभा निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्याच्याकडून मालमत्तेविरुध्दचा तसेच शरिराविरुद्धचा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्यास त्यास मुंबई पोलीस अधिनियमानुसार सोलापूर, सांगली व धाराशिव या ३ जिल्ह्यातून तडीपार करणे करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!