
पूजाच्या याच व्हिडिओमुळे माजी उपसरपंच गोविंद बर्गेंनी केली आत्महत्या?
पुजाचा तो व्हिडिओ पोलिसांच्या हाती, 'तो' व्हिडिओची जोरदार चर्चा, काय आहे त्या व्हिडिओत? कोण आहे पूजा गायकवाड?
बार्शी – : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील लखसुमा गावचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात येऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आता पुजाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो बर्गे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून या प्रकरणी वैराग, ता बार्शी जि सोलापूर, पोलिसांनी पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आता पुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिने गोविंद बर्गे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता, असे बोलले जात आहे. पूजाच्या रील मध्ये पुरुषाच्या आवाजात ‘मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है… तेरे पास क्या है…!’ असा प्रश्न विचारला जातो, त्यावर पूजा लिप सिंक करत ‘तेरे जैसे चार है..!’ असे प्रत्युत्तर देताना व्हिडिओत दिसत आहे. तिने साधारण आठवडाभरापूर्वी हे इन्स्टा रिल तयार केले होते. यामध्ये पूजा गायकवाड हिच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत. तिच्या हातात पाचशेची एक कोरी करकरीत नोट आहे. या व्हिडीओत एक ऑडिओ असून पूजा गायकवाड त्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. ‘मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल’, असा आशयाचा हा ऑडिओ आहे. या इन्स्टाग्राम रिलचा आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याची चर्चा आता रंगली आहे.
गोविंद बर्गे यांच्या पोस्टमार्टेम अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. वैराग पोलीस पूजाची कसून चौकशी करत आहेत. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलीस तपास जोरात सुरु आहे.