
घराबाहेर पडू नको नाहीतर संधी मिळाल्यावर ते ठार मारतील
कमल काैरच्या हत्येनंतर या रिलस्टारला धमकी, अश्लील व्हिडिओ पोस्ट करते म्हणत दिली धमकी, प्रकरण काय?
अमृतसर – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कमल कौर भाभी उर्फ कांचन कुमारी हिच्या गुढ मृत्यूने खळबळ उडाली. ती भटिंडा-चंदीगड महामार्गाला लागून असलेल्या भुचो कलान येथे एका पार्किंगमधील कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आता या प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे.
कमल कौर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृतदेह ११ जूनच्या रात्री कारमध्ये मिळाला होता. पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवत ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी कमल यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पण, या प्रकरणातील मास्टरमाईंड अमृतपाल सिंह हा परदेशात पळाला आहे. अश्लील कंटेनमुळे तिची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कोैर प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कौर घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पण तपासात अमृतपाल हा तिची गाडी चालवत होता. त्याचवेळी त्यांच्या बाजूनेही एक कार चालली होती. कांचनच्या कारमध्ये काैर, अमृतपाल, निर्मलजीत आणि जसप्रीत होते. अमृतपालने शिताफीने काैरच्या दोन मोबाइलचे पासवर्ड मिळवले. त्यानंतर अमृतपालने सांगितल्याप्रमाणे जसप्रीत आणि निर्मलजीत या दोघांनी काैरला कानशीलात लगावून दिली. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. अमृतपालने या आधीही कमल कोैर यांना आपल्या नावतून कोैर काढून टाकण्यास सांगितले होते. पण आता कमल काैर यांच्या हत्येनंतर बब्बर खालसा इंटरनॅशनलने या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेनेसोशल मीडिया इन्फ्लुएंसर दीपिका लुथरा आणि युट्यूबर प्रीत जट्टीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘ई-मेल पाठवणाऱ्याने दीपिका लुथरा अजूनही आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करत असल्याचं म्हटलं आहे, आणि तिला तिच्या घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे. त्यामुळे दोघींनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलिसांच्या सायबर सेलने मेहरोनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो परदेशात पसार झाल्याने त्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी शीतल नावाच्या माॅडेलची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रिलस्टार तरूण तरूणी घाबरले आहेत.
कमल कौरचे इन्स्टाग्रामवर ‘कमल कौर भाभी’ नावाने अकाउंट होते. त्यात तिचे ३.८७ लाख फॉलोअर्स होते. ती ‘फनी भाभी टीव्ही’ नावाची यूट्यूब चॅनेल चालवत होती, त्यात २.७ लाख सबस्क्राइबर्स होते आणि फेसबुकवर ७.७ लाख फॉलोअर्स असलेले अकाउंट होते. पण आता तिची हत्या झाली आहे.