
डाॅ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा?
आरोपी महिलेला अटक, महिलेच्या वकिलाचा मोठा दावा, प्रकरणाची गुंतागुंत वाढली?
सोलापूर – सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी डोक्यात गोळ्या घालून आयुष्य संपवले. त्यांच्या आत्महत्येनंतर रोज नवे खुलासे होत आहेत. आता शनिवारी रात्री या आत्महत्या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे.
डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी महिला मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री महिलेला अटक केल्यानंतर रविवारी तिला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने संशयित आरोपी असलेल्या महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही महिला डॉक्टर कळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी या पदावर होती. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय की, ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं, प्रशासकीय पदाची सूत्रं दिली त्याच महिलेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले. हे आरोप सहन होत नाहीत त्यामुळे मी जीवन संपवत आहे. पोलीस आता या प्रकरणी आरोपी मनिषा माने हिच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान मनीषा हिच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार, ती सुट्टीवर गेली होती. त्या सुट्टीचा एक दिवसाचा पगार रूग्णालयाकडून कापण्यात आला. त्यानंतर मनीषा आणि रूग्णालयात क्लॅशेस झाले. मनीषाने मेल करत आपली खदखद व्यक्त केली होती, असे सांगितले. तर दुसरीकडे तिने आपल्या रुग्णालयात इतकी वर्षे काम करूनही आता अचानक अधिकार कमी केले जात आहेत, पगार कमी केला जात आहे, हे योग्य नाही. असेच सुरू राहिल्यास मी आत्मदहन करेन,’ अशी धमकी वळसंगकर यांना दिली होती, असा देखील दावा करण्यात आला आहे.
वळसंगकर रूग्णालयात मनीषा काळे या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. मनीषा काळे यांचं बीएएमस शिक्षण झालेय. त्यांचा नवरा नवरा राजकीय पक्षाशी निगडीत आहे. २००८ पासून मनीषा ही वळसंगकर रूग्णालयात काम करत होती. मागील २० वर्षांत घेतलेल्या मेहनीमुळेच ती सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहात होती.