
विश्रांतवाडी मध्ये एका बिल्डरने एका व्यक्तीवर बंदूक रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रांजणगावातील जमीन बिल्डरने विकत घेतली होती. मात्र, पैशाच्या वादातून बिल्डरने त्या व्यक्तीला बंदूक दाखवून धमकावल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिल्डरने दाखवलेले पिस्टल नसून लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.