Latest Marathi News
Ganesh J GIF

या कारणामुळे मोहनने केली श्रीगंगाची चाकूने वार करून हत्या

पती पत्नीच्या नात्याचा रक्तरंजित अंत, पालकांचे छत्र हरपल्याने मुलगा अनाथ, तपासात धक्कादायक कारण समोर

बंगळूर – पती पत्नीच्या नात्यात विश्वास फार महत्वाचा असतो. जर या नात्यातील विश्वास नाहीसा झाला तर नाते तुटायला किंवा संपण्यास वेळ लागत नाही. संशयातून पत्नीची आत्महत्या केल्याची घटना कर्नाटनमध्ये समोर आली आहे.

श्रीगंगा असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे, तर मोहनराज असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगाचे मोहन राजशी सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दांपत्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. पण मागील काही दिवसापासून दोघांमध्ये वाद होत होते. श्रीगंगाचे आपल्या मित्राशी अनैतिक संबंध असल्याच्या मोहन राजच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून दोघे वेगळे राहत होते. पण मोहन राज आपल्या मुलाला भेटायला येत असे, असेच मोहन राज मुलाला भेटायला आल्यानंतर श्रीगंगाबरोबर त्याचा वाद झाला. यामुळे संतापलेल्या मोहनराजने श्रीगंगा आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाली असता वाटेतच चाकुने हल्ला केला. त्याने श्रीगंगावर चाकुने सात ते आठ वार करुन पोबार केला.

गंभीर जखमी झालेल्या श्रीगंगाला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापुर्वी डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीसांनी मोहन राखला अटक केली आहे. पुढील तपास हेब्बागोडी पोलिस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!