Latest Marathi News
Ganesh J GIF

दत्ता गाडेने माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केला

स्वारगेट प्रकरणात तरुणीचा धक्कादायक खुलासा, पत्रात पोलीसांवर आरोप, म्हणाली इच्छा नसतानाही....

पुणे – स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेने पाठवेल्या पत्रात आरोपी दत्ता गाडे याने तिच्यावर
तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक गाैप्यस्फोट केला आहे.

स्वारगेट एसटी आगारामध्ये बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे या नराधमाने एका तरुणीवर अत्याचार केले होते. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी दत्ता गाडेला गावातून अटक करण्यात आली. त्याचबरोबर गाडेच्या वकिलांनी तरुणीबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. आता तरूणीने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवत पोलीसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरुणीने आपल्या पत्रात म्हंटल कि, काही राजकीय नेत्यांनी माझ्या चारीत्र्यावर संशय व्यक्त करणारी तसेच आरोपीचं समर्थन करणारी वक्तव्य केली. त्याची तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा संमती घ्यायचे. त्यानंतर माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे . मला ३ वकिलांची नावे सुचवली. यातून एक निवडावा, असं सांगण्यात आले. मात्र मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? असा सवाल पीडित मुलीने केला. दत्ता गाडेने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. आरोपीने तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला. त्यानंतर आरोपी दत्ता गाडेने पळ काढला, असे तिने या पत्रात लिहिले आहे.

अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात लिहिले आहे. ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणे तिला अधिक महत्त्वाचे वाटले, असेही तिने नमूद केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!