
माजी खासदार असलेल्या अभिनेत्रीला ईडीने पाठवले नोटीस
बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेत्री अडचणीत, या तारखेला ईडीचे हजर राहण्याचे आदेश, अटकेची टांगती तलवार?
मुंबई – बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात दोन अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलं आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांना ही नोटीस बजावण्यात अली आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये खळबळ उडाली आहे.
ईडीने उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. याआधी १५ सप्टेंबर रोजी माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना ईडीच्या मुख्यालयात हजर व्हावे लागणार आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात अनेक मोठ्या खेळाडूंचीही चौकशी करण्यात आलेली. आता मिमी चक्रवर्ती आणि उर्वशी रौतेला यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक चित्रपट कलाकार बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याबद्दल कायदेशीर अडचणीत सापडले आहेत, ज्यात अभिनेता राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज, मंचू लक्ष्मी आणि निधी अग्रवाल यांची नावं समाविष्ट आहेत. यापैकी अनेक स्टार्स या प्रकरणात चौकशीमुळे ईडीसमोर हजर झाले आहेत. ऑनलाइन बेटिंगला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली या स्टार्सविरुद्ध समन्स जारी करण्यात आलं होतं. बेकायदेशीर अॅप बेटिंग प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांचीही चौकशी केली आहे. या बंदी घातलेल्या अॅप्समध्ये xBet, फेअरप्ले, Parimatch आणि Lotus 365 यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे अॅप स्वतःला स्किल बेस्ड गेम म्हणवतात. नंतर, त्यांचं अल्गोरिथम फसवं आहे. हे अॅप्स पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यांच्यावर बंदी देखील घालण्यात आली आहे.
हे अॅप्स प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टार, खेळाडू तसंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मदत घेतात. त्या बदल्यात, हे प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि त्यांची जाहिरात करायला सांगतात. जेव्हा सेलिब्रिटी अशा अॅप्सचा प्रचार करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम तरुणांईवर होतो. ज्यामुळे त्यांना या अॅप्समध्ये ऑनलाइन बेटिंग गेम खेळण्यास भाग पाडले जाते.