
ईडीने काँग्रेसच्या माजी आमदाराला फिल्मी स्टाईलने ठोकल्या बेड्या
पळून जाणाऱ्या आमदाराच्या पाठलागाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, जमिनीवर पाडले, कपडे फाटले, काय घडले?
हरियाणा – हरियाणातील काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छौक्कर यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली धरम सिंह छौक्कर यांना दिल्लीतून अटक केली आहे. अतिशय फिल्मी स्टाईल पद्धतीने त्यांना अटक करण्यात आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
धर्म सिंह छौक्कर यांना ईडीने १५०० कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून ईडी त्यांचा शोध घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार धर्म सिंह छौक्कर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बसले होते. ईडीला ही माहिती मिळाल्यानंतर अधिकारी तिथे पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहून छौक्कर पळून जाऊ लागले. यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. व्हिडिओमध्ये, दिसत आहे की छौक्कर हॉटेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ईडी अधिकाऱ्याने त्यांना खाली पाडले आणि काॅलरला धरून उठवले यावेळी त्यांचा शर्ट देखील फाटला. माजी काँग्रेस आमदार धर्म सिंह छौक्कर, त्यांची मुले विकास आणि सिकंदर यांच्यावर १५०० हून अधिक घर खरेदीदारांना फसवल्याचा आणि त्यांची ५०० कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी मार्चमध्ये ईडीने धर्म सिंह छौक्क यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु माजी आमदार न्यायालयात हजर राहिले, तसेच ते तेंव्हापासून फरार होते. याप्रकरणी ईडीने त्यांची ४४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
धरम सिंग छौक्कर यांनी २००८ साली राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसचे उमेदवार संजय छौक्कर यांचा पराभव करून ते पहिल्यांदाच एचजेसीच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत २०१९ मध्ये भाजपचे शशिकांत कौशिक यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले होते. यंदा मात्र त्यांचा पराभव झाला.