Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता होणार

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणीला केंद्रीयमंत्री गडकरी यांचा ग्रीन सिग्नल

पुणे दि २ (प्रतिनिधी) – पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून आपण सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या रस्त्यांच्या कामांबाबत निर्णय सतत बदलले जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याची बाब केंद्रीयमंत्री गडकरी यांना पत्र पाठवून निदर्शनास आणली होती. या पत्राची दखल घेऊन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी जलदगतीने निर्णय घेत या सर्व महामार्गांची कामे मार्गी लावली आहेत. नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ४ महिन्यात डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे निर्देश कन्सल्टंन्ट संस्थेला देण्यात आले आहेत, तर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या एलिव्हेटेड रस्त्यांसाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या गंभीर अपघाताची दखल घेऊन हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची माझी मागणीही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी उचलून धरली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या कामाचे नियोजन करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

केंद्रीयमंत्री गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेताना चाकणपासून २७ कि.मी. अंतरावर मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कची घोषणा करीत माझ्या सर्वच मागण्यांची पूर्तता केली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने गडकरी साहेबांचे मन:पूर्वक आभारी असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!