
लहान मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा पोलीसांकडून एनकाऊंटर
सीसीटीव्ही व्हायरल, पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार, नराधमाचे संतापजनक कृत्य
हुबळी – कर्नाटकच्या हुबळी येथे एका पाच वर्षांच्या चिमूरडीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. बिहारमधील स्थलांतरीत मजूर रितेश कुमारने गुन्हा केल्याचा आरोप होता. पोलीसांनी त्याचा इन्काउंटर केला आहे.
कर्नाटकातील हुबळी याठिकाणी ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. चॉकलेट आणि खेळणी देण्याचे आमीष दाखवून आरोपीने या मुलीला सोबत घेऊन जात तिच्यासोबत हे भयानक कृत्य केले होते. ही घटना रविवारी हुबळीच्या विजयनगर भागामध्ये घडली. याठिकाणी एक ५ वर्षांची मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. आरोपी रितेशची नजर तिच्यावर पडली. त्याने चिमुकलीला चॉकलेटचे आमीष दाखवत तिला पकडले आणि तिचे अपहरण करून तिला नजीकच्या निर्जनस्थळी नेले. मुलगी जोरजोरात ओरडू आणि रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज इतका मोठा होता की स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण ते येईपर्यंत आरोपी रितेशने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी रितेश तिथून पळून गेला होता. पोलीसांना याची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच आरोपीला अटक केली. रितेशने मुलीचे अपरहण करण्यापासून तिच्यासोबत केलेले संपूर्ण दुष्कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आरोपी रितेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांमध्ये त्याला अटक केली. रितेशला पोलिसांनी अटक केली. पण पोलिसांच्या ताब्यातून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी रितेशवर गोळ्या झाडल्या. रितेशच्या पाय आणि पाठीला गोळी लागली. रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी रितेश कुमारला पकडले असता त्याने पोलिस पथकावर हल्ला केला. पोलिसांनी त्याला आधी इशारा दिला, पण तरीही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पोलिसांना प्रत्युत्तर म्हणून गोळीबार करावा लागला, यात त्याचा मृत्यू झाला.