
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान, तो चेन्नईहून परत आल्यानंतर त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. हंगरकेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आले आहेत. जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत त्यांनी आणखी कोणाला अलकायद्याचे सदस्य होण्यासाठी त्याने माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखोचे पॅकेज तो घेतो.

एटीएस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले. असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते. दरम्यान, एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी काही संबंध होता का, त्याच्याकडे हे साहित्य का आणि कोणत्या उद्देशाने होते, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून त्याच्या मित्राचीही चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाईल. तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे.यापूर्वी आयसिस मॉड्यूलशी संबंधित तपासादरम्यान एटीएसने या महिन्यात काही संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी एकूण १९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सखोल चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी संपर्क होता का आणि त्या संपर्काचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडे अल-कायदाचे साहित्य का आणि कशासाठी ठेवले होते, हेही आम्ही तपासत आहोत. त्याच्या ताब्यात असलेल्या मित्राची चौकशी केली जाणार असून, त्याचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणीही केली जाईल. तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.” दरम्यान, एटीएसने या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील विविध भागांत सर्च ऑपरेशन राबवले होते. ही कारवाई एका जुन्या आयसिस मॉड्यूलच्या तपासाशी संबंधित होती. त्यावेळी संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान १९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.

