Latest Marathi News
Ganesh J GIF

गर्भवती महिलेलाही सोडलं नाही; नराधम अशोक खरातचा थरकाप उडवणारा प्रताप

दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. एसआयटीने खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य सापडले आहे. हेच ते गुंगीकारक औषध आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे? याचे उत्तर आता फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले हे द्रव्य अत्यंत संशयास्पद आहे. महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी खरात या द्रव्याचा वापर करत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. एसआयटीने हे नमुने तातडीने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खरातचा ‘पेनड्राइव्ह’ आणि हे ‘हिरवे द्रव्य’ हे दोन पुरावे त्याला जन्मठेपेपर्यंत खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज, सोमवार (दि. 13 एप्रिल) रोजी संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, एसआयटी आता अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे तब्बल 14 गुन्हे दाखल झाले आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!